आजच्या महत्त्वाच्या बातम्या

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

आता मोबाईल📱📱 switch off झाला तरी whatsApp वापरा

WhatsApp’ने 📱📱एक नवीन भन्नाट फीचर आणलं आहे. आजपासून एक WhatsApp अकाऊंट आता चार मोबाईल डिव्हाईसेसला कनेक्ट करता येणार आहे. एवढाच नाही तर नवीन मोबाईलमध्ये WhatsApp ओपन केल्यामुळे तुमची WhatsApp चॅटही डिलिट होणार नाही. अशी माहिती मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

😰 🇮🇳🇮🇳जवानाच्या वाहनावर 🚌🚌हल्ला ११ जवान शहीद

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत😭. आज दंतेवाडा येथून नक्षलविरोधी अभियानासाठी डीआरजी दल पाठवण्यात आलं होतं. डीआरजी पथक परतत असताना अरनपूर रस्त्यावर नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहानांवर हल्ला करत आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत.

💧💧👑 जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा अहवाल जाहीर💪💪

देशभरातील तळी, टाक्या, तलाव आणि इतर जलसाठ्यांच्या संदर्भातील समावेशक माहिती कोष असलेला भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात 574 नैसर्गिक आणि 96,488 मानव-निर्मित जलाशय आहेत.

By:

Posted in:


One response to “आजच्या महत्त्वाच्या बातम्या”

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started